घरभेटींद्वारे आयुष्मान गोल्डन कार्ड प्रक्रिया ‘मिशन मोड’वर राबवा

0
18
अकोला, दि. 30 : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १७ लाख ३३ हजार व्यक्ती पात्र आहेत. घरभेटींचे नियोजन करून प्रत्येक पात्र व्यक्तीला हे कार्ड मिळवून द्यावे. गावोगाव ही प्रक्रिया ‘मिशन मोड’वर राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
कार्डाच्या वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे तालुका यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख १७ हजार व्यक्तींना कार्डवाटप झाले आहे. पात्र असलेल्या सर्व १७ लाख ३३ हजार व्यक्तींना कार्डाचा लाभ मिळण्यासाठी आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने प्रत्येक घरी भेट देऊन आवश्यक कार्यवाही करावी. सर्व तालुक्यांत हे काम गतीने पू्र्ण होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.
‘टार्गेटेड ॲप्रोच’ ठेवून काम पूर्ण करा. पुढील १० दिवसांत प्रगती दिसावी. याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.