गोंदिया, 30 जानेवारी- आमदार विनोद अग्रवाल यांनी काटी येथील कबीर आश्रमात कार्यकर्ता व जिल्हा निहाय ग्रामस्थांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या.बैठकीत उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी पाणीपुरवठ्यासाठी वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या आणि शेतीच्या कामांसाठी १२ तासांऐवजी ७ ते ८ तास वीज मिळण्याच्या समस्येबाबत शेतकऱ्यां द्वारे आमदार विनोद अग्रवाल यानां माहिती देण्यात आली आणि १२ तास विजेची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या या भीषण समस्येची तातडीने दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस पाठवून या समस्येची माहिती दिली आणि १२ तासांत शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली.आमदार विनोद अग्रवाल यांनी पाठविलेल्या एसएमएसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता शेतकऱ्यांना कोरडवाहू पिकांच्या उत्पादनासाठी शेतीसाठी 12 तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार मानले.