नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर यादवचौक येथे निक्षय शिबीर संपन्न

0
15

गोंदिया,दि.31 जानेवारी – नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर यादव चौक येथे शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबिर संपन्न झाले.शंभर दिवसीय टीबी रुग्णशोध मोहीमेचे उद्घाटन पुर्व पार्षद पकंज यादव व वैद्यकिय अधिकारी डॉ.ए.खान  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
वैद्यकिय अधिकारी डॉ.खान यांनी प्रास्तविक करताना भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने जिल्हयामध्ये शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम दि.७ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत नविन क्षयरुग्णांचे शोध मोहिम राबवुन मोफत औषधोपचार देण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोअिम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने दि. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यत १०० दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येत  असल्याचे सांगितले.
या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येत असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी अंती निदान झालेल्या संशयित रुग्णांचे मोफत एक्स-रे/ थुंकी नमुने तपासण्यात येत आहे.
कार्यक्रम प्रसंगी यादवचौक कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या सहव्याधी लोकांची आरोग्य तपासणी सोबतच निक्षय वाहन द्वारे मोफत एक्स-रे व थुंकी नमुने तसेच लोकांचे विविध प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.खान यांनी याप्रसंगी दिली आहे.
सदर निक्षय शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ.खान, आरोग्य सेवक सोनलकुमार सावरकर,आकाश निकुसे,रवी भांडारकर,कमलेश पंचभाई,अभिजीत सोनपरोते, काळे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ शोभित पेंडलेवार,आरोग्य सेविका राखी गौतम,आशा सेविका नमिता यादव,विद्या तिरपुडे,अनिता समृतवार,पौर्णिमा यांचेसह वार्डपातळीवरचे पदाधिकारी व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.