आता विकासाचे नवे पर्व सुरु:- जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
232

= बोंडगांवदेवी क्षेत्रात विकासकामांचे भुमिपुजन =
अर्जुनी-मोर. — बोंडगावदेवी जि.प.क्षेत्रासह अर्जुनी-मोर. तालुका आपली कर्मभुमी आहे.या क्षेत्रातील मतदार बंधु,भगीणींनी मला जि.प.मधे निवडुन पाठवीले,त्यामुळेच मला गोंदिया जि.प.चा अध्यक्ष बनण्याची संधी प्राप्त झाली.त्यामुळे मतदारांच,माझ्या कार्यकर्ते व पदाधिकारी,तथा माझ्या वरिष्ठ नेत्यांचे प्रथमत: मी आभार मानतो.आता बोंडगावदेवी जि.प.क्षेत्रासह,अर्जुनी-मोर तालुका व संपुर्ण गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आली असून जिल्ह्य़ाच्या तिजोरीची चाबी आपणाकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी तथा प्रशासनातील सर्व अधिका-यांच्या समन्वयातून व सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा नवा पर्व सुरु झाल्याचे प्रतिपादन गोंदिया जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
बोंडगावदेवी क्षेत्रातील इंजोरी ,चान्ना-पंचवटी येथील विविध विकास कामांच्या भुमिपुजन प्रसंगी ता.2 फेब्रुवारी रोजी जि.प.अध्यक्ष भेंडारकर बोलत होते.यावेळी इंजोरी येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लघु पाटबंधारे नहर दुरुस्ती दहा लक्ष रुपये तसेच चान्ना ते पंचवटी रस्त्यावर मोरी बांधकाम नऊ लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्याला सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, बोरटोला/ इंजोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच काशिनाथ कापसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नंदकुमार रामटेके, इंजि. दहिवले, महालगावच्या सरपंच मीनाताई शहारे, बाकटीच्या सरपंच सरिताताई राजगिरे, पोलीस पाटील डाकराम मेंढे, ग्रामपंचायत सदस्य दीपंकर उके, प्रेमलाल नारनवरे, राजू मेंढे, युनाथ मेश्राम, ललित हेमने, झासीराम रहेले, तसेच ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.