रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले..
गोंदिया,दि.३ : पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही आज ३ फेबुवारीला सम्राट राजभोज जयंती उत्सव समितीच्यावतीन वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात पवार प्रगतीशील मंच गोंदिया,कुडवा,सुर्याटोला, फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री,दवनीवाडा,तिल्ली मोहगाव, रापेवाडा,गोरेगाव, तिरोडा,रावणवाडी,देवरी आदी ठिकाणाहून आलेल्या रॅलीचे जयस्तंभ चौकात स्वागत करण्यात आले.त्यानंतर आज ३ फेब्रुवारीला जयस्तंभ चौकातून या महारॅलीला जयस्तंभ चौकातून महाॅरलीला शुभारंभ करण्यात आले.रॅलीला आमदार आमदार विजय रहांगडाले,माजी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले,नेतराम कटरे, जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे, माजी आमदार हेमंत पटले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले,पवार प्रगतीशील मंच अध्यक्ष अॅड.पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,जिल्हा परिषद सदस्य डाॅ.भुमेश्वर पटले,डाॅ.लक्ष्मण भगत,प्रविण पटले,माजी सभापती मनोज बोपचे,सुरेश रहागंडाले, पवार प्रगतीशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, राजेश चव्हाण, महारॅली समिती अध्यक्ष पप्पू पटले,नंदुभाऊ बिसेन,जितेश टेंभरे,पंचायत समिती सदस्य अजाबराव रिनायत,बाबा भैरम,बाजार समितीचे सभापती पिंटू रहागंडाले,महिला समिती अध्यक्ष आरती पारधी,धनिषा कटरे, आदींनी झेंडी दाखवून शुभारंभ केला.जयस्तंंभ चौक,गांधी प्रतिमा,दुर्गा चौक,गोरेलाल चौक मार्गे नेहरु चौकात रॅलीचे समापन करण्यात आले.गोंदियातील रस्त्यावर महारॅलीच्या हजारो पोवार समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.राजाभोज जयंती महोत्सव निमित्त भव्य रॅलीचे आयोजन भव्य रॅलीचे गोंदिया शहरात आयोजन करण्यात आले होते. शहरातील जयस्तंभ चौक ते नेहरू चौक चादंनीचौक, गोरेलाल चौक , इंदिरा गांधी स्टेडियम येथून राजाभोज जयंती महोत्सव निमित्त ढोल ताशा डिजे च्या गजरात दिव्य भव्य रैली काढण्यात आली. गोरेगाव येथील झाकी, पोवारी न्यृत्य आकर्षानाचे केंद्र ठरले यावेळी मोठ्या संखेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया गोरेगाव तिरोडा, आमगाव सालेकसा, आदी तालुक्यातील पोवार समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. शहरात निघालेली रॅली लक्षवेधी ठरली यावेळी पोलिसांच्या शहरात ठीक ठिकाणी चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. या रॅलीने गोंदिया शहर चक्रवर्ती सम्राट राजा भोज च्या जयकाराने निनादला होता मोठ्या संख्येत जिल्ह्यातील पवार समाज बांधव या महोत्सवात सहभागी झाले होते.जयस्तंभ चौक,गांधीप्रतीमा ,चादंणी चौक,गोरेलाल चौक मार्गक्रमण करीत रॅली नेहरु चौकात पोचली. त्याठिकाणाहून छोटा गोंदिया, फूलचूर येथील रॅली फुलचूरकडे व मुर्री येथील रॅली मुर्रीकडे रवाना करण्यात आले.
गोंदियात निघालेल्या चक्रवर्ती सम्राट राजाभोज जंयती महोत्सवानिमित्त महारॅलीत समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या रॅलीत पोवार महासभेचे उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी,पोवार महासंघाचे विशाल बिसेन,वकील बार असो.चे जिल्हाध्यक्ष एड.टी.बी.कटरे,सचिव आऱ.ओ.कटरे,यु.टी.बिसेन,जितेश राणे,राजेश चव्हाण,संजय रहागंडाले, पं.स.सदस्य स्नेह गौतम, जय पटले, मनोज रहागंडाले, गोवर्धन बघेले, गुणराज ठाकरे, सुभाणराव रहागंडाले, राजेश अंबुले, मोनु पारधी, दुर्गाप्रसाद बिसेन,राजीव ठकरेले,बी.डब्लू.कटरे, शिशिर कटरे, महेंद्र बिसेन, भागचंद रहागंडाले, प्रा.संजीव रहांगडाले,प्रीती देशमुख, सुरेश पटले, हेमंत बघेले,अनिल रहागंडाले,गोरेगाव येथील दिलीप चव्हाण,लिलेश रहागंडाले,आनंंद पटले,सुरेश रहागंडाले,तेजेंद्र हरिणखेडे, अजित टेंभरे, मुर्री येथील समितीचे अध्यक्ष पंकज टेंभरे, सचिव संदिप शरणागत, उपाध्यक्ष मनोज रिनायत,सदस्य मुकेश रिनायत, योगेश शरणागत, अशोक हरिणखेडे, भुवन रिनायत, उमेश पारधी, ओमप्रकाश पारधी, तिर्थराज रहागंडाले, ओ.जे.बिसेन, आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वीतेकरीता महारॅली उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार (पप्पु) पटले, दुर्गाप्रसाद ठाकरे, प्रविण बिसेन, उमेश पारधी, शामबाबा पटले, संजय ठाकरे, सुरेश रहांगडाले, प्रकाश टेंभरे, प्रवेश बिसेन, पिंटू ठाकूर, सचिन रहांगडाले, भुमेश्वर पारधी आदिंसह पोवार समाज गोंदियाच्या समस्त कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.रॅलीतील सहभागी समाजबांधवाकरीता दुर्गा कॅटर्स,संजू ठाकरे,भाजप,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,भाजप आमदार विनोद अग्रवाल,काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आदी मित्र परिवाराच्यावतीने नास्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती.