32.4 C
Gondiā
Wednesday, February 12, 2025
Home विदर्भ ‘ एकजूट होऊया, कर्करोगाला हरवू या ‘ च्या घोषणांनी दुमदुमले शहर

‘ एकजूट होऊया, कर्करोगाला हरवू या ‘ च्या घोषणांनी दुमदुमले शहर

0
42
गोंदिया,दि.०४ः- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग प्रशासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस.सामान्य रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक कर्करोग दिनाच्या अनुशंगाने दि.4 फेब्रुवारी रोजी मंगळवारी हा दिवस जिल्हास्तरावर साजरा करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार यावर्षी हा दिवस “युनायटेड बाय युनिक” या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे.या दिनाच्या अनुषंगाने राज्यातील 30 वर्ष वयोगटापेक्षा अधिक सर्व नागरिकांकरिता आरोग्य मोहीम राबवून विनामूल्य कर्करोग आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.सदर मोहिमेकरता राज्य शासनाने “एकजूट होऊया,कर्करोगाला हरवू या“हे घोषवाक्य निश्चित केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी म्हटले आहे.
राज्यातील प्रामुख्याने कर्करोग सदृश आणि कर्करोग बाधित रुग्णांना योग्य निदान आणि कर्करोग उपचार देण्याकरिता सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा जसे की कर्करोग तपासणी, कर्करोग निदान आणि कर्करोग उपचार शस्त्रक्रिया जसे किमोथेरपी व रेडिएशन या आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवून आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी या प्रसंगी माहीती दिलेली आहे.
सर्वात प्रथम कर्करोग दिनाच्या अनुषंगाने कर्करोग जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले. प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून बाई गंगाबाईं स्त्री रुग्णालय-सिव्हील लाईन-हनुमान चौक-ईंगळे चौक-मनोहर चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. एकजूट होऊ या-कर्करोगाला हरवू या ,आरोग्यदायी जीवन शैली पाळू या-कर्करोगाला दुर ठेवू या,खावु नका गुटखा- लागेल जीवनाला झटका,अब गुटखा नही है खाना- बस कँसर को है दुर भगाना, असे विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली.प्रभात फेरी दरम्यान मनोहर चौक येथे कर्करोग जनजागृती पथनाट्य नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी मार्फत सादरीकरण करण्यात आले.चौकात यावेळी सर्वसामान्य लोकांची गर्दि पहावयास मिळाली.प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी,रिलायन्स रुग्णालयाचे कँसर विभागातील डॉक्टर,अशासकीय संस्थेचे कर्मचारी,केटीएस विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक, आरोग्य विभागातील अधिकारी व स्टाफ नर्स प्रामुख्याने उपस्थित होते.प्रभातफेरी दरम्यान बँनर द्वारे जनजागृती तसेच कर्करोग आजाराबाबतचे पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.प्रभातफेरी दरम्यान ईंगळे चौक येथे तंबाखु विरोधी शपथ घेवुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जागतिक कर्करोग दिन प्रभातफेरी व पथनाट्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  असांसर्गिक कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी,जिल्हा मौखिक तज्ञ डॉ.अनिल आटे,दंत शल्य चिकित्सक डॉ.अमोल राठोड,जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड,डॉ.स्वर्णा उपाध्याय,स्वाती पाटील,रेखा कानतोडे,भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर,मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर,दंत सहाय्यक विवेकानंद कोरे,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आईसी अधिकारी प्रशांत खरात यांनी मोलाची कामगिरी केली.