**शिक्षक समितीतर्पेâ महिला मेळावा संपन्न
गोंदिया : आजच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती साधून आपली ताकद दाखविली आहे. समाजाच्या प्रगतीत महिलांचा वाटा अन्ययसाधारण आहे. खर्या अर्थाने महिलांची प्रगती ही समाजाची प्रगती आहे, यामुळे महिलांनी कशाल्याही प्रकारचे संकुचित दृष्टीकोन न बाळगता आपल्या कलागुणांना वाव देवून प्रगती करावी, असे प्रतिपादन शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.ममता येडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती महिला आघाडीच्या वतीने शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ.ममता येडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.भारती तिडके होत्या. उद्घाटन समाजसेविका सौ.सविता बेदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्कारमुर्ती म्हणून शिक्षण विस्तार अधिकरी पौर्णिमा विश्वकर्मा, सेवानिवृत्त अधिकारी कुसूम पुसाम, मंजु वैष्णव, कुमूद शहारे, अंजली ब्राम्हणकर, डॉ.नुरजंहा पठाण तर अतिथी म्हणून अल्का बडवाईक, प्रमिला चौहान, सिंधू मोटघरे, माधुरी बावणकर, इंजी.शिखा पिपलेवार, आरती पारधी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबई फुले व मॉ शारदेच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर सत्कार मुर्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण व सशक्तीकरणावर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. तर महिलांसाठी एकल गायन, नृत्य, उखाणे आदि विविध स्पर्धा आयोजित होत्या. कविता चक्रवर्ती, कलावती कोल्हाटकर, स्नेहा रामटेके यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सौ.ममता येडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी पंधरे तर आभार वंदना झोडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.व्ही.एस.बावणकर, प्रतिमा खोब्रागडे, प्रमिला चौहान, भारती कठाणे, सिंधू मोटघडे, के.एल.पुसाम, एम.आर.बावणकर, अरूणा मंडिला, शगुफता शेख, एस.पी.येडे, के.पी.खेडीकर, उषा पारधी, रिता बांते, खेमलता मोरघडे, वंदना झोडे, वैशारी भुरे, प्रतिभा झिंगरे, लिला जाधव, पुर्णा मडावी, भिवरे, चैताली धोटे, विनिता श्रीवास्व, ललिता राऊत, पुष्पा लिल्हारे, आशा धोपटे आदिंसह पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
०००००