शिक्षक समिती सडक अर्जुनीकडून नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार

0
52

सडक अर्जुनी– महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया कडून नवनिर्वाचित सभापती चेतनभाऊ वडगाये तसेच नवनिर्वाचित उपसभापती  सौ. निशाताई काशीवार यांचा सत्कार सोहळा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी कोहमारा येथे किशोर डोंगरवार अध्यक्ष शिक्षक पतसंस्था तथा विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनोद बडोले शाखाध्यक्ष, पी एन बडोले, बी जे येरणे, घनश्याम कापगते, बाळू वालोदे, नरेश मेश्राम, आनंद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी नुकत्याच या महिन्यात सेवानिवृत्त होणारे राजू कोटांगले जि प प्राथमीक शाळा मुनेश्वरटोला तसेच , एन ए बडोल जि प. वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हसवाणी यांचा सेवानिवृत्तीवर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी किशोर डोंगरवार सर विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया यांनी शिक्षक समिती ची ध्येय धोरणे आणि सामाजिक बांधिलीकी जपणारे उपक्रम यांची माहिती आपल्या मनोगतून दिली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका सडक अर्जुनीचे तालुकाध्यक्ष जे.डी. म्हशाखेत्री यांनी प्रस्ताविक तर सरचिटणीस रतन गणविर यांनी आभार म्हणाले, संचालन नंदू वैद्य यांनी केले.

शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडल्याविल्या जातील सोबतच गुणवंत्ता व दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळामधून दिले जाते त्यामुळे शाळांचा विकासला प्राधन्य राहील असे सभापती चेतन वळगाये आणि उपसभापती निशा काशिवार यांनी म्हटले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष जे डी म्हशाखेत्री, सरचिटणीस रतनकुमार गणविर, जयंत रंगारी, पुरुषोत्तम नेवारे ,अश्विन राऊत, पि.सी. चचाने , सी. बी.गोबाडे, के के देशपांडे ,लालचंद भजने, रवींद्र मारवाडे, संतोष बारसागडे . बी एम गुरुनुले, एन. डी. गणवीर, संजीव मेश्राम,आशिष वागदेवे, संजय कापगते , अरविंद कापगते , एन. एस.मेश्राम,बडोले सर,अरुण वैद्य ,कोवे सर,श्भास्कर नागपुरे. वाय.एच. काशिवार ,पारस कोरे, टी एस मानकर, जे जे मलकाम, राजू चौधरी, अनिल कापगते सर, एफ के कोवे, रामटेके सर मुंढरीटोला , राऊत सर दोडके , एन एन पाटील, पी बी शहारे, जे बी कऱ्हाडे, प्रकाश कापगते उपस्थित होते.