अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत जिल्हयातील अन्नव्यवसायिक यांना प्रशिक्षण

0
52

गों‍दिया दि. 06 : फोस्टेक प्रशिक्षण हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा उपक्रम असून भारत सरकार आणि अन्न सुरक्षा यांच्या मार्फत घेण्यात येतो. फोस्टेक प्रशिक्षण गोंदिया येथे माहे फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्वतयारीसाठी शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक हॉटेल पॅसिफिक रेलटोली येथे बैठक घेण्यात आली.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्रशिक्षण भागीदारामार्फत प्रशिक्षण दिले जाणार असून सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायाची परवाना प्रत, व्यवसायातर्फे सहभागी होणारे मालक, शेफ, सुपरवायजर यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन, सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी यावेळी केले.

या बैठकीस गोंदिया शहर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश शेठ, उपाध्यक्ष राजेश चावडा, सचिव रमेश अग्रवाल, कोषाध्यक्ष ललितसिंग भाटिया व सर्व सदस्य उपस्थित होते.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यावसाय चालवण्याऱ्यांसाठी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित होत नाही, तर व्यावसायाची विश्वासार्हत आणि गुणवत्ता देखील वाढते. प्रशिक्षणाचा उद्देश अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत जागरुकता निर्माण करणे व अन्न व्यावसाय चालकांना योग्य प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर ग्राहकांना योग्य सेवा देणे हा आहे.

फोस्टेक प्रशिक्षणामुळे अन्न सुरक्षा मानकांचे योग्य पालन करणे सोपे होते, ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचवण्यासाठी मदत मिळते. तसेच ग्राहकांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे, याची खात्री मिळते. स्वच्छता, अन्न हाताळणी, आणि आपात्कालीन स्थिती हाताळण्याबद्दल कर्मचारी अधिक जागरुक आणि प्रशिक्षित होतात. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्यास व्यवसायाला दंड किंवा परवाना रद्द होण्याचा धोका असतो. फोस्टेक प्रशिक्षण प्रशिक्षणामुळे हे धोके कमी होतात. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सहभागी अन्न व्यवसाय चालकाना फोस्टेक प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे या प्रशिक्षणाचा अन्नव्यवसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.