;इंजोरी गावात शालेय स्नेह संमेलनानिमित्त अवतरले मिनी मंत्रालय
; सर्व जि. प. सदस्य तसेच नवनियुक्त पंचायत समिती सभापती व उपसभापती सत्कार; मान्यवराकडून कौतुक
अर्जुनी मोरगाव;शेतकरी, शेतमजूर व गरजू यांचे जीवनमान उंचावण्याकरिता कार्य करणार तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येईल’असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केले ते इंजोरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार समारंभात बोलत होते,ग्राम इंजोरी येथील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार (दि.५) ला करण्यात आले होते, यानिमित्त या गावचे सुपुत्र असलेले लायकरामज भेंडारकर यांची नुकतीच सर्व जी.प. सदस्याकडून अध्यक्षपदी अविरोध निवड झाली, इंजोरी ग्राम हे त्यांचे जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने स्नेहसंमेलनानिमित्त शाळेच्या व ग्रामवासीयांच्या वतीने गोंदिया जि.प च्या सर्व सदस्य तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. अगदी कमी पटसंख्या असलेल्या या शाळेचे मान्यवरांनी मन भरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे,बांधकाम सभापती योपेंद्र टेंभरे, कृषी सभापती रुपेश कुथे, समाज कल्याण सभापती पूजाताई सेठ तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व पंचायत समिती सभापती/उपसभापती आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान सहकार व संघटनात्मक उल्लेखनीय कार्याबद्दल शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे शाखाध्यक्ष कैलास हांडगे, यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठोबा रोकडे आणि उपक्रमशील शिक्षक लाखेश्वर लंजे, शिक्षक विकास नाकाडे, शिक्षक उमेश बोरकर,शिक्षक मंगेश बोरकर व शाळेला सदैव मदत करणाऱ्या पालकांचा शाळा व ग्रामवाशीयांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठोबा रोकडे सूत्रसंचालन शिक्षिका नमिता लंजे व आभार शिक्षक लाखेश्र्वर लंजे यांनी मानले.