चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, या उद्योगांमध्ये कामगारांच्या शोषणाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांची कायमस्वरूपी उपस्थिती महत्त्वाची आहे. सध्या मात्र, हे अधिकारी महिन्यात फक्त २-३ दिवस कार्यालयात उपस्थित राहत असल्याने कामगारांच्या तक्रारी प्रलंबित राहत आहेत.
आम आदमी पार्टीने या समस्येवर प्रकाश टाकत, आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. त्यांनी स्वतः सहाय्यक आयुक्त कार्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी व्हिडिओद्वारे जनतेसमोर मांडल्या, ज्यामुळे जिल्हाभर ही चर्चा रंगली आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा सहसंघटनमंत्री अजय बाथव यांचा विशेष सहभाग होता.चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम आदमी पार्टी नेहमीच कटीबद्ध आहे. या मागणीसाठी लढा सुरूच राहणार आहे.