गोंदिया : जिल्ह्यातील अधिसूचित नद्यांच्या यादीत शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीचा समावेश नव्हता. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही अभियानात पांगोली नदीला वगळण्यात येत होते. शासनाने पांगोली नदीचा अधिसूचित नद्यांच्या यादीत समावेश करावा, अशी वारंवार मागणी पांगोली नदी वाचवा अभियान संघर्ष कृती समिती शासनाकडे करीत होती. या प्रयत्नाला यश आले असून पांगोली नदीचा समावेश गोंदिया जिल्ह्यातील अधिसूचित नद्यांमध्ये झाली आहे.पांगोली नदीच्या पुनरुज्जीवन, संरक्षण, संवर्धन व विकासासंदर्भात ४४ कोटी रुपयांचा जलसंधारण विभागाने नदी पुनरुज्जीवनासंदर्भात तयार केलेला डीपीआर कालबाह्य व त्रुटी पूर्ण असल्याने नदीचे पुन्हा सर्वेक्षण करून नवीन सर्वागीण डीपीआर तयार तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.गोंदिया पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी नदीचे पुन्हा सर्वेक्षण करून नवीन डीपीआर तयार करण्याची प्रकिया सुरु होणार असल्याचेही पांगोली नदी वाचवा अभियान समितीला कळविले आहे.यासंदर्भात मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांच्याकडूनही पांगोली नदीचे त्वरित पुनरुज्जीवन करण्याची
बालाघाट सीमारेषेवरील वाघ नदीत संगम
गोरेगाव तालुक्यातील तेढा गावातील सरोवरातून पांगोली नदीचा उगम झाला. गोंदिया तालुक्यातील खातिया गावाजवळ छिपीया येथे मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट सीमारेषेवरील वाघ नदीत तिचे संगम होते. गोंदिया व गोरगाव तालुक्यातील ६० किमी क्षेत्र, आमगाव तालुक्यातील १५ किमी क्षेत्र या नदीने व्यापले आहे, या दोन्ही तालुक्यांतील शेकडो शेतकरी पांगोली नदीच्या पाण्यावर शेती पिकवतात.
पुनरुज्जीवन, संरक्षण, संवर्धनाचा मार्ग मोकळा
अनेक कारणांमुळे या नदीची अवस्था बिकट होत चालली होती. यासंदर्भात शासनाने पांगोली नदीचा अधिसूचित नद्यांच्या यादीत समावेश करावा, अशी वारंवार मागणी पांगोली नदी वाचवा अभियान संघर्ष कृती समिती शासनाकडे करीत होती, दरम्यान त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून पांगोलीच्या पुनरुज्जीवन, संरक्षण, संवर्धन व विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.