शासकीय तंत्रनिकेतन येथे महाआरोग्य शिबिर

0
20

गोंदिया 14 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कॅम्पस हेल्थ अँड इकोसिस्टीम समिती अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमूने 100 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.प्रशांत बागडे,डॉ. अनंत चांदेकर डॉ. लक्षदीप पारेकर, डॉ.राठोड, डॉ.नाकाडे, डॉ.राजेंद्र वैद्य डॉ. अजय मालपाणी, डॉ अमित इलमकर,डॉ. राहुल झा, डॉ, स्वीटी नागपुरे, डॉ. मयूर मेश्राम. डॉ.पोलोमी बारीक येथील मंडळींनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

 हेल्थ इज वेल्थ प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा आरोग्य विषयक सल्ला महाआरोग्य शिबिरात देण्यात आला, शिबिरामध्ये थायरॉईड, सिकलसेल, रक्त तपासणी, दंत तपासणी, नाक कान डोळे, घसा व स्त्रीरोग अशा वेगवेगळ्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या. अवयवदान व नेत्रदान याविषयी वैद्यकीय मंडळींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गुळघाटे, मारुती कुचनकर लोकेश, मिर्झा बेग, गोपाल  नागोसे, प्रा.सारिका शहारे,डॉ सोनिया राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.