शाळेला गावाचा आधार तर गावाला शाळेचा अभिमान असावा -संदीप तिडके

0
489

सांस्कृतिक महोत्सव निमित्त पीएमश्री शाळा बेरडीपार येथील बक्षीस वितरण प्रसंगी प्रतिपादन

तिरोडा— बेरडीपार येथे पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बेरडीपार येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक माणिक शरनागत यांच्या मार्गदर्शनात गाव सहकार्याने तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा यानिमित्ताने आयोजित करण्यात आल्यात. ‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीला अनुसरून गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत तीन दिवशीय सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करून दाखवले.
बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती तिरोडा येथील गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, सौ पूनम घुले ज्येष्ठ अधिव्याख्याता सौ कांचन बिसेन,बक्षीस वितरक म्हणून जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी.साकुरे, श्री अशोक बरीयेकर,केंद्रप्रमुख दिलीप हिरापुरे, शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक बिसेन, ग्रामपंचायत सरपंच चेतनाताई कोल्हटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश कटरे उपाध्यक्ष सुनीता शहारे ,रमेश कोल्हटकर ,गणराज बिसेन माजी सैनिक, विद्याधर राऊत उप सरपंच, श्री जयकुमार रीनायात,माता पालक समिती अध्यक्ष सरिता ठाकरे यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी पाहुण्यांना दाखविण्यात आली, प्रास्ताविका मधून शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक माणिक शरनागत यांनी शाळेच्या विकासात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करीत शाळेत सुरू असलेल्या अनेक उपक्रमाची माहिती दिली. मान.श्री.रणजितसिंग देओल प्रधान सचिव शिक्षण यांनी केलेल्या शाळेच्या प्रशंसेचा आवर्जून उल्लेख केला.प्रमुख मार्गदर्शन म्हणून शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी शाळेच्या विकासाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा असून शाळेला गावाचा आधार हवा तर गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे जर शाळा चालत असेल तर निश्चितच जिल्हा परिषद शाळांना सुवर्ण दिवस आल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक पंकज असाटी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता उच्च श्रेणी मुख्याध्यापक माणिक शरणागत, पंकज असाटी ,रवींद्र बावनकर, युवराज भगत , टी.के बोपचे,सत्यवान निपाने ,कुमारी वर्षां मुळे ,कुमारी भाग्यश्री रहागडाले यासह सर्व व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक संघ पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.