अर्जुनी-मोर. येथे 19 फेब्रुवारीला भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

0
50

= विवीध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन
अर्जुनी-मोर.-शिवजन्मोत्सव समिती आणि समस्त नगरवासी अर्जुनी मोर.च्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळा तथा खुली ग्रुप डान्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर.च्या प्रांगणात आयोजित शिवजयंती महोत्सव 19 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. दुपारी बारा वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी सहा वाजता भव्य खुली ग्रुप डान्स स्पर्धा चे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये खुले ग्रुप डान्स स्पर्धा मध्ये प्रथम बक्षीस 51 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 25 हजार रुपये तर तृतीय बक्षीस 15 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3 हजार 500 रुपये तर द्वितीय बक्षीस 2 हजार 500 रुपये, तर तृतीय बक्षीस 1हजार 500 रुपये ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शिव जन्मोत्सव समिती आणि समस्त नगरवासी अर्जुनी मोर.च्या वतीने करण्यात आले आहे.