आ.रहांगडालेनी घेतला धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत कामांचा आढावा

0
61

तिरोडा,दि.१७:- धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत तिरोडा व गोंदिया तालुक्यातील  ३०५५.५९ हेक्टर जमिनिमध्ये रबी धानपिक लावले गेले आहे.सदर क्षेत्राची वाढ होवून विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळावा व शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतक-याच्या शेतात पाणी जावे,याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाड उपसा सिंचन विभागाच्या अधिकार्यासोबत नुकताच आढावा घेतला.यात नहर दुरुस्तीकरिता २०० कोटी विशेष मंजूर निधीची कामे वेळेवर होण्याकरिता आमदार दर महिन्याला संबधित यंत्रणेसोबत आढावा बैठक घेत आहेत.याव्यतिरिक्त उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणारे सर्व नहराच्या दुरुस्तीचे नियोजन करून मंजुरीकरिता शासनाकडे पाठविण्याचे निर्देश आमदार रहागंडालेंनी दिले.यावेळी कार्यकारी अभियंता अंकुर कापसे ,उपभियंता पंकज गेडाम, प्रणय नागदिवे,मुख्याधिकारी राहुल परिहार उपस्थित होते.