गोरेगाव,दि.१८ः तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथील वार्ड क्र. 02 मध्ये “जन सुविधा” योजनेअंतर्गत सरपंच सौ. प्रेमलाताई नरेश राऊत यांचे अध्यक्षतेखाली सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे सभापती डाॅ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अरविंद के. साखरे,उपसरपंच भाऊलाल कटरे,ग्रामपंचायत सदस्य जावेद खान,दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे,शामकलाताई खंडवाये,सरिताताई सुरजोसे,माधुरीताई चौधरी,भूमेश्वरीताई पारधी,आम्रपालीताई राऊत,संगीताताई सरजारे,लिपिक सुनिल वाघाडे,संगणक परिचालक रोहित पांडे,अजय नेवारे,रवि गमधरे प्रामुख्याने उपस्थित होते.