= आमदार राजकुमार बडोलेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे मागणी
अर्जुनी-मोर. -निसर्गाची भरभरून देन असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव -नागझिरा- प्रतापगड इटियाडो, चुलबंद, मांडोदेवी, कचारगड हे ऐतिहासिक धार्मिक व पर्यटन स्थळ असून या स्थळांना एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यात समाविष्ट करून या स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन केली आहे. याच आशयाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनाही दिले आहे.
गोंदिया जिल्हा हा निसर्ग संपत्तीने व वनाने आच्छादलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात उद्योगधंदे यांना वाव नाही. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या दोन्ही तालुक्यातील मोठा क्षेत्र वनाने व्यापलेला असून पर्यावरण संवेदनातील क्षेत्र पी एस झेड आहे. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात वारंवार संघर्ष निर्माण होतो. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही. म्हणून या ठिकाणी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर करणे अत्यंत गरजेचे आहे. नवेगाव बांध नागझिरा इटियाडोह प्रतापगड चुलबंद मांडोदेवी कचारगड या स्थळांचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर करावा व त्यात खालील बाबी समाविष्ट करण्यात याव्यात व त्यासाठी किमान 200 कोटी निधी सन 2025 – 26 च्या बजेट मध्ये मंजूर करावे अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. नवेगाव बांध, इटियाडोह प्रतापगड या तिन्ही स्थळांना जोडणारी रस्ते, विश्रामगृह, बोटिंग व विविध पायाभूत सुविधा निर्माण करून युवकांना रोजगार निर्माण करावा, नवेगाव बांध व प्रतापगड या क्षेत्राचा वेगळा मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, या भागातील शेती व दूध व जनावरे यांचे व्यवस्थापन करावे, नागझिरात चुलबंद बोदलकसा या क्षेत्राचा वेगळा मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, यासाठी या क्षेत्राचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यात समावेश करून त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी ही आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व चर्चा करून तथा निवेदन देऊन केली आहे.