विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा आमदार बडोलेंनी घेतला आढावा

0
110

अर्जुनी-मोर.दि.१९ः गोंदिया जिल्ह्यातील तसेच अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील विविध पाटबंधारे प्रकल्पाच्या अनुषंगाने आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी नुकताच नागपुर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सोनटक्के यांचे दालनात आढावा बैठक घेऊन रखडलेली कामे शिघ्रगतीने पुर्णत्वास कसे नेता येतील याबाबत सविस्तर चर्चा करुन काही मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या.
या महत्वपूर्ण बैठकीत कलपाथरी,कटंगी तलावांचे हस्तांतरण आणि दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी,बाघ- इटियाडोह धरणाची दुरुस्ती,झाशिनगर उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करणे,धापेवाडा टप्पा-3 व टप्पा- 4 चे काम जलदगतीने सुरु करुन पुर्णत्वास नेणे,चुलबंद,इटियाडोह धरण क्षेत्रातील विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे,नवेगावबांध व इटियाडोह येथे पर्यटकाचे दृष्टीने बोटिंग सुरु करणे, इत्यादी महत्वाचे विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
गोंदिया जिल्ह्यातील विवीध सिंचन प्रकल्प वनविभागाच्या आडकाठी धोरणामुळे अडगळीत पडले आहेत. प्रकल्प सुरु करतेवेळी जे जुने प्रस्ताव तयार करण्यात आले.त्या प्रस्तावानुसारच रखडलेल्या सिंचनप्रकल्पाचे काम जलदगतीने झाल्यास हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा होवु शकतो.तसेच धापेवाडा टप्पा 3 व 4 चे काम पुर्ण झाले तर शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ होवुन सिंचनाची व्याप्ती वाढुन त्याचा लाभ सडक/ अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीला होवु शकतो.त्यामुळे या सिंचनप्रकल्पाच्या रखडलेल्या कामाला गती कसी देता येईल यावरही विस्तृत चर्चा करण्यात आली.तसेच काही महत्वाच्या सुचना आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी दिले.
आढावा बैठकीला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सोनटक्के,मुख्य अभियंता श्री पवार,पाटबंधारे विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले,कार्यकारी अभियंता अंकुर कापसे धापेवाडा उपसा सिंचन योजना, कार्यकारी अभियंता अमृत पाटील मध्यम प्रकल्प,श्री कुरेकर बाघ- इटियाडोह तसेच मुठाळकर कार्यकारी अभियंता यांत्रीकी विभाग व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.