* सटवा येथे शिवाजी महाराज जयंती साजरी
गोरेगांव- धर्म चिकित्सक, सर्वांगस्पर्शी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे एक ऊर्जा केंद्र होय. त्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन सर्वांचा विकास होण्यासाठी स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्यातील आदर्शाचे अनुकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मार्गदर्शन करताना मुख्य वक्त्यांनी केले.
तालुक्यातील सटवा येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी स्थानिक विठ्ठल रुक्मिणी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक वक्ता म्हणून भागचंद्र रहांगडाले व डिलेंद्र कटरे हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना केले ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोरेगाव पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी, उपसरपंच विनोद पारधी, पोलिस पाटील टीकाराम रहांगडाले, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र कटरे, गोरेगाव खरेदी विक्रीचे संचालक पुरनलाल ठाकूर, जीडीसीसी बँक व्यवस्थापक देवकांत ठाकूर, मयूर कोल्हे, योगेश चौधरी, संजय कटरे, भोजराज कटरे, नितीन कटरे, कुलदीप वैद्य आदी उपस्थित होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना भागचंद्र रहांगडाले यांनी शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणायचे, त्यांची असलेली दूरदृष्टी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डीलेंद्र कटरे यांनी शिवचरित्र वाचन करून शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला उजाळा देत गारद म्हणत अभिवादन केले. यावेळी सभापती चित्रकला चौधरी यांनीही समयोचित मार्गदर्शन करीत छत्रपती शिवराय यांची महिलांविषयी असलेल्या धोरणावर प्रकाश टाकला. यावेळी मयूर कोल्हे, विनोद पारधी, नितीन कटरे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सुभाष ठाकूर तर आभार जगजीवन ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश रहांगडाले, महेंद्र पटले, प्रदीप चौधरी, खोमेश रहांगडाले, मनीष रहांगडाले, सागर ठाकूर आदींनी सहकार्य केले.