गोंदिया-प्रागतिक, विज्ञानवादी, डाव्या पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत कॉ. ऍड. गोविंद पानसरेचा खून होऊन आज 20 फेब्रुवारीला त्यांचा स्मृती दिवस 10 वर्षे होत आहेत. खून खटल्यातील आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या मागणीला घेवून भारतीय कम्युनिस्ट पार्टी सह डाव्या व लोकशाही आघाडी,समविचारी पक्ष, पुरोगामी जनसंघटनाच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने, धरणे, मोर्चे आंदोलन करण्यात येत आहे. या जणांदोलनाच्या कार्यक्रमांतर्गत गोंदिया येथील प्रशासकीय इमारती समोर भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे निदर्शने आंदोलन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच्या नांवे एसडीएम कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यात हौसलाल रहांगडाले,मिलिंद गणवीर,रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उके, वाय. एम. रामटेके, सुरेश रंगारी, जितेंद्र गजभिये, प्रकाश डहाट,आयटकचे विनोद शहारे, सुनील लिल्हारे,सुरेश ठाकरे, सुनीता मळावी, जीवनकला वैद्य, पौर्णिमा चुटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत शामिल होते.