अर्जुनी/मोर.– गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले केशोरी हे गाव परिसरातील 40 ते 50 गावाचे मुख्य बाजारपेठ आहे.केशोरी आणि परिसरातील नागरिकांना शासकीय कामाकरिता गोंदिया जिल्हा मुख्यालयी जाव लागत असल्याने केशोरी ते गोंदिया या मार्गावर बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असुन सामान्य नागरिकांना मोठी गैरसोय होत असून रुग्ण,विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.केशोरी हा तालुक्यातील महत्त्वाचा गाव असून येथे शिक्षण,आरोग्य व दैनंदिन गरजांसाठी अनेक नागरिक गोंदियाला ये-जा करतात.मात्र सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढत आहे.नागरिकांची मागणी लक्ष्यात घेऊन केशोरी जि प क्षेत्राचे जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गोंदिया आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असुन परिवहन महामंडळाने अद्याप ही ठोस पावले उचलले नाहीत.प्रवाशांच्या सोयीसाठी त्वरित बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांच्यासह स्थानिक व परिसारातील नागरिकांनी केली आहे. जर लवकर बससेवा सुरू झाली तर अनेक प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.