अर्जुनी-मोर.–अर्जुनी-मोर. तालुक्यातील तिबेटियन कॅम्प येथे तिबेटियन बौध्द धम्म अध्यात्मिक गुरु कायब्जे योंगझिन लिंग रिनपोचे यांचे आगमन प्रित्यर्थ अर्जुनी-मोर. विधानसभेचे आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी ता.20 फेब्रुवारी ला प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
अर्जुनी-मोर. तालुक्यात तिबेटियन वसाहत असुन या ठिकाणी भव्यदिव्य बौध्द विहार आहे.या ठिकाणी वर्षभर पर्यटक हजेरी लावत असतात.या ठिकाणी नुकतेच तिबेटी तुळकु आणी महान अध्यात्मिक तिबेटियन बौध्द धम्म गुरु कायब्जे योंगझिन लिंग रिनपोचे यांचे आगमन झाले.तिबेटियन बांधवांचे वतीने पारंपारीक व बौद्ध धम्म पध्दतीने जंगी स्वागत करण्यात आले. तिबेट कॅम्प ता.अर्जुनी-मोर. येथे आयोजित तिबेटियन बौध्द धर्मीय कार्यक्रमाला आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी उपस्थिती लावुन त्यांना तिबेटियन बौध्द धम्म गुरु रिनपोचे यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणी त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.
तिबेटियन बौध्द धम्म अध्यात्मिक गुरु रिनपोचे यांनी केवळ 12 वर्ष ड्रेपुंग लोसेलिंग मोनास्टीक युनिव्हर्सिटीमधे कठोर अभ्यास करून वयाचे 21 व्या वर्षी गेशे ल्हारामपा ही प्रतिष्ठीत पदवी संपादन केली.त्यानंतर ग्युटो तांत्रीक मठाचे शिस्तपाल आणी मठाधिपती म्हणुन महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.अशा महान तिबेटियन बौध्द धम्म अध्यात्मिक गुरुचे आशीर्वाद आपल्याला लाभल्याने आपन धन्य झालो असुन त्यांचे मार्गदर्शनाने बौध्द धम्माचा प्रसार व प्रसार तथा जनतेची सेवा करण्याची नवी उर्जा मिळाल्याची भावना आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
यावेळी सरपंच भोजराज लोगडे,राजहंस ढोक,संजय खरवडे, प्रदिप मस्के,व अन्य मान्यवर उपस्थित होते.