तुमखेडा बुज ते ढिमरटोली रस्त्याचे माजी.जि.प.अध्यक्ष रहागंडालेंच्या हस्ते भूमिपूजन

0
47
गोरेगाव,दि.२४ः- तालुक्यातील तुमखेडा बुज येथे रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रकल्पांतर्गत तुमखेडा बुज ते मोहगाव बुज आणि तुमखेडा बुज ते ढिमरटोली (तुमखेडा बुज) या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सोय उपलब्ध होणार असून, दळणवळण अधिक सुलभ होईल. रस्त्यांमुळे व्यापार आणि विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भूमिपूजन समारंभाच्या वेळी बोलताना माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले म्हणाले की, ‘या रस्त्यांच्या निर्मितीमुळे गावकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.’ या कार्यक्रमात सरपंच रंजूकुमार येळे, उपसरपंच सुषमाबाई तुमसरे, सदस्य अजय पटले, प्रेमेश्वर प्रधान, ललिताबाई जांभूळकर, शांताबाई आंबेडारे, सपनाबाई धामगाये, प्रेमलताबाई बेलंगे, माजी अध्यक्ष भैयालाल वंजारी, बाबुराव बनसोड, महेंद्र कुमार रहांगडाले, खेमेश शरणागत, सचिव रुद्राकार, विनोद वहांगडाले, योगराज पटले, रोजगार सेवक पवन राऊत, ग्रामीण पोलीस हवालदार पृथ्वीराज कलसर्पे, माजी सदस्य होमेंद्र पटले, निर्मल पटले, विनय पटले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.