डाॅ.भगत बांधकाम व अर्थ,हर्षे शिक्षण व आरोग्य तर दिपा चंद्रिकापूरेकडे पशु व कृषी विभागेच सभापती पद

0
1175

गोंंदिया,दि.२४ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४ विषय समितीकरीता १० जानेवारीला जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे ४ ही उमेदवार विजयी झाले होते.त्यामध्ये टखेडा गटाच्या  जि.प.सदस्य पौर्णिमाताई ढेंगे महिला बालकल्याण सभापती पदावर तर समाजकल्याण सभापती पदावर तिरोडा तालुक्यातील सरांडी जि.प.गटाच्या रजनीताई कुंभरे या निवडूण आल्या होत्या.उर्वरित ३ विषय समिती सभापती पदाचे खातेवाटप करण्याकरीता आज २४ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.या विशेष सभेत
अर्थ व बांधकाम विषय समिती सभापती पदावर डाॅ.लक्ष्मण भगत,कृषी व पशुसंवर्धन विषय समिती सभापती पदी  दिपा चंद्रिकापूरे तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांना आरोग्य व शिक्षण विषय समितीचे सभापती पद देण्यात आले.विशेष म्हणजे हर्षे यांना कुठले खाते दिले जाते याकडे लक्ष लागले होते.