26.3 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समिती कडून काँग्रेस नेते वड्डेटीवारांच्या वक्तव्याचा निषेध

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समिती कडून काँग्रेस नेते वड्डेटीवारांच्या वक्तव्याचा निषेध

0
80

गोंदिया,दि.२४- काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रसार माध्यमातून नुकतेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांना स्वप्न पडतात, विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्व संतामुळे व संघामुळे यश मिळाले म्हणणे म्हणजे मतदाराचा अपमान असून ते संत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली.त्याविरोधात गोंदिया जिल्हा श्री संप्रदाय कडून 23 फेब्रुवारीला शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे जाहीर निषेध नोंदवण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष मुलचंद खांडवाये, निरीक्षक नवरंग मेश्राम, महिला निरीक्षक वैशाली चतुर, जिल्हा कर्नल प्रकाश कोरे, महिला अध्यक्ष ताराताई राऊत, रोशन कुर्वे, जयपाल खांडवाये, पंकज खांडवाये, दामोदर शेंडे यासह जिल्हा कमेटी पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व 200 च्या जवळपास भाविक उपस्थित होते.