प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गोरेगांव शहरतील 80 लाभार्त्यांना पट्टे व कार्यारंभ आदेश

0
17

जनहित हीच आमची प्राथमिकता – आ. विजय राहंगडाले

माजी नगराध्यक्ष इंजी. आशीष बारेवार यांच्या प्रत्नांना यश

गोरेगाव,दि.२५ः- बौद्ध विहार, चंद्रपूरटोली / गोरेगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश आणि अतिक्रमण धारक 80 लाभार्थीना जमीन मालकी हक्काचे पट्टे वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, माजी नगराध्यक्ष इंजी आशिष बारेवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या ध्येयधोरणानुसार आम्ही समर्पित सेवाभावाने कार्य करत आहोत. गरिबांना घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांना मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम एक मोठे पाऊल आहे असे प्रतिपादन आमदार विजय राहंगडाले यानी केले.

आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकांना शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या कार्याच्या अनेकांनी श्रेय घेण्याच्या प्रयत्न करून अनेक गोरगरीब लाभार्थ्यांची आंदोलनाच्या नावावर आर्थिक लूट केली, परंतु शहरातील जनतेला माहित आहे की या कार्यासाठी कुणी कार्य केले असे प्रतिपादन इंजी. आशीष लक्ष्मीकांत बारेवार यानी केले.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शहरात इंदिरानगर मधील या लाभार्थ्यांचा मुद्दा अनेकांनी गाजवण्याचा प्रयत्न केलेला होता. यामध्ये इंदिरानगर मध्ये अनेक वर्षांपासून तिथं लोकांना इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात आलेला होता. परंतु त्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात आलेले नव्हते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्याकरिता अनेक अडचणी सामोरे आलेल्या होत्या. या शासकीय जमिनीची मोजणी केली असता अनेक लाभार्थी खाजगी जमिनीमध्ये दाखवत होते परंतु माजी नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार यांच्या सततच्या पाठपुरावामुळे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्तक्षेपामुळे या सर्व लाभार्थ्यांची पुनर् मोजणी 2024 मध्ये करण्यात आली. व त्यातील चूक दुरुस्त करून सर्व लाभार्थ्यांना यामध्ये लाभ देण्यात आला. हे ऐतिहासिक कार्य असून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रम कोणत्याच नगरपंचायत, नगरपरिषद यांनी केलेली नाही. त्यासाठी गोरेगाव नगरपंचायत प्रशासनाने मोलाचे कार्य केलेले आहे.
तसेच याप्रसंगी शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) टप्पा 2.0 अंतर्गत शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांना परत आपले हक्काचे घर देण्याचे काम सुरू झालेले आहे.त्याचबरोबर आदिवासी समाजातील नागरिकांकरिता शबरी आदिवासी घरकुल योजना ( शहरी ) सुद्धा नगरपंचायत गोरेगावने सुरू केलेली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या दोन्ही योजनेचे लाभ घेण्यात यावे असे आवाहन सर्व नगर वासियांना आमदार विजय रहांगडाले व माजी नगराध्यक्ष इंजी. आशिष बारेवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याला आमदार विजय रहांगडाले, माजी नगराध्यक्ष इंजी. आशिष बारेवार, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, मुख्याधिकारी राहुल परिहार ,माजी सभापती हिरालाल रहांगडाले,माजी सभापती रवींद्र बिसेन,सावलराम मारबदे , माजी ग्राप. सदस्य अरविंद जयस्वाल, माजी नगर सेविका निमावतीताई धपाडे, गायत्री तिडके प्रशासकीय अधिकारी, सर्व नप गोरेगाव कर्मचारी व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.