गोंदिया,दि.२५ः शहरापासून जवळच असलेल्या शिवधाम पर्यटन व तिर्थक्षेत्र ‘क’ वर्ग, फुलचूर येथे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन २६ ते २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी महाअभिषेक करण्यात येणार आहे.तसेच ह.भ.प.सोनवाने महाराज यांच्या संगीतमय कार्यक्रममाचे व भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच प्रयागराज येथील महाकुंंभात पोहचू न शकलेल्या भाविकांकरीता महाकुंभातील त्रिवेणी संगम जल गोंदियात माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातुन व सकल हिंदू समाज गोंदिया यांच्या वतीने आणून महाशिवरात्रीला श्रद्धाळूसाठी गंगाजलच्या पवित्र स्नानाची सोय करण्यात आली असून श्रध्दाळूंनी या संंधीचा लाभ घ्यावे असे आवाहन शिवधाम पर्यटन व तीर्थक्षेत्र,समिती फुलचूरच्यावतीने करण्यात आले आहे.