पंचशील विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

0
194

मराठी भाषा व्यापक व लवचिक – मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण

अर्जुनी मोरगाव: तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथे दिनांक २७ फेब्रुवारीला विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काव्य लेखन व सादरीकरण, निबंध लेखन तसेच शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डी.एच मेश्राम व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

एन.पी समर्थ यांच्या प्रस्तावनेनंतर उपरोक्त स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टपणे विविध विषयावर मराठी या मातृभाषेत स्वलिखित काव्याचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मातृभाषेत माझे आवडते साहित्यिक व पुस्तक या विषयावर निबंध लेखन केले तर काहींनी सुंदर हस्ताक्षरात शुद्धलेखन करून परीक्षकांचे मन जिंकले.
मुख्याध्यापक यांनी आपल्या मराठी भाषेची श्रीमंती, व्यापकता व लवचिकता उदाहरणादाखल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच आपली मराठी ही मातृभाषा जगाच्या पाठीवरील अनेक भाषेसह बोलीभाषेला सामावून घेणारी नदीच्या प्रवाहासारखी असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून प्रतिपादन केले.

यावेळी सहायक शिक्षक आर.डी कोल्हारे, ए.डी घानोडे, टी.के भेंडारकर, डी.एच मेश्राम व ए. ए रामटेके, एस.व्ही मेश्राम यांनी सुद्धा मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या संचालनाबरोबर डी.एच भैसारे यांनी स्वलिखित विनोदी व विचार प्रवर्तक अशा कवितेचे सादरीकरण केले. तर आभार एन.एस नंदागवळी यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका पार पाडली. वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता झाली.