इयत्ता तिसरीचे विद्यार्थी सोडवतात अब्जावधी संख्येचे भागाकार

0
1071
सातासमुद्रापलीकडे गेलेली आणि आंतरराष्ट्रीय* *मान्यता प्राप्त भागाकाराची सोपी पद्धत
खामगाव– भागाकाराचे उदाहरण पाचवी सहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सोडविले नाही तर चक्क तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने सोडविले आहे.अशी उदाहरणे जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर या शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारे सर्व विद्यार्थी सोडवितात.याकरीता जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता -खामगाव जि-बुलढाणा येथील शिक्षक राजेश कोगदे सर यांनी एक भागाकाराची पध्दत विकसित केली आहे आणि विशेष म्हणजे ही पद्धत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रकाशित झाली आहे.राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना गणित सोपे जावे यासाठी या पद्धतीचा वापर करत आहे.विशेष म्हणजे या पद्धतीसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन ही साठ हजार रुपयाची फेलोशीप सुद्धा मिळाली.या पद्धतीचे विशेष म्हणजे पाढे पाठांतराशिवाय विद्यार्थी भागाकाराची उदाहरणे सोडवू शकतात आणि या सरावातूनच विद्यार्थ्यांचे पाढे सुद्धा पाठ होतात.सद्या पाढे पाठांतर व भागाकारासाठी ही पद्धत वरदान ठरली आहे असे म्हणायला हरकत नाही.