श्व् शासनाने जाहिर केले होते एकुण 18 लाख रूपयांचे बक्षिस
गडचिरोली,दि.२७ः- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 702 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 फेब्राुवारी रोजी 01 डी.व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह 01 सदस्य असे एकुण 02 जहाल माओवाद्यानी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे.यामध्ये कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो, (डी.व्हि.सी.एम सप्लाय टीम), वय 56 वर्षे, रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम), वय 30 वर्षे, रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर 16 लाख रूपयाचे तर सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिला एकुण 8.5 लाख रुपये व सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 22 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व परविंदर सिंग, कमांडंट 192 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.