भंडारा,दि.28: अप्पर मुख्य सचिव ऊर्जा तथा पालक सचिव भंडारा श्रीमती आबा शुक्ला यांनी आज बेला ग्रामपंचायतला भेट दिली. बेला ग्रामपंचायतला राष्ट्रीय पातळीवरील कार्बन न न्यूट्रल पंचायत असा पुरस्कार मिळाल्याने त्या ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. कामाचे कौतुक केले.
यावेळी बेला ग्रामपंचायतच्या सरपंच शारदा शेंडे गायधने यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबतची सविस्तर माहिती श्रीमती शुक्ला यांना दिली.
गावामध्ये 90 हजारावर अधिक झाडे लावून कार्बन उत्सर्जनाला कमी करण्याचा प्रयत्न व पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीद्वारे नागरिकांच्या सक्रिय सहभागाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लोकसहभागाने या वर्षात या ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारांच्या स्वरूपात अडीच कोटींची बक्षिसे मिळाली, याबाबत श्रीमती शुक्ला यांनी या ग्रामपंचायतचे व त्या कार्यकारिणीचे गावकऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत द्वारे उपस्थित समस्यांमध्ये शाळांसाठी वाढीव खोल्यांबाबत लवकर शिक्षण विभागाची चर्चा करणार असल्याचे आश्वासन श्रीमती शुक्ला यांनी दिले.