गोंदिया :रायपूरकडून गोंदियाकडे सालेकसा मार्गावर असलेल्या नवाटोला गावाजवळ टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH 40 – BL8001 स्वतः चालक आणि मालक मिथुन शामकुवर नागपुरे हे चालवत असताना नवाटोला गावाजवळ अचानक ब्रेक लायनर जाम झाल्याने चाक गरम झाले.आणि टायरने आग पकडली.त्या ट्रकमध्ये पशु आहार वाहून नेल्या जात होता.ही दुर्घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी घडली. जवळपास साडेआठ लाख रुपयाच्या मालाचे नुकसान झाले.तसेच ट्रकची किंमत जवळपास 20 लाख असल्याचे मालकाने सांगितले. चालक आणि मालक हा राहणार सावरी तालुका गोंदिया येथील रहिवासी असून, तशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे नोंदविण्यात आली आहे.