आरबीएसके 2.0 विशेष तपासणी अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन

0
55

गोंदिया- राज्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग,एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग,आदिवासी विभाग,नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने आरबीएसके 2.0 विशेष तपासणी मोहीम दि. 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येणार असुन त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विशेष तपासणी मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदिया येथे दि. 1 मार्च रोजी संपन्न झाले.
दि.1 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पुणे येथे आरबीएसके 2.0 विशेष तपासणी मोहीमेचे राज्यस्तरीय उद्घाटन मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे उपस्थितीत केल्यानंतर त्याचे थेट प्रक्षेपणानंतर  जिल्हात प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदिया येथे जिल्हास्तरीय या अभियान कार्यक्रमाचे दूरद्रुश्य प्रणाली द्वारे उद्घाटन सकाळी नऊ वाजता जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला.
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदिया येथे कार्यक्रम प्रसंगी दूरद्रुश्य प्रणाली सोहळा दाखविण्यात आला. जिल्हास्तरीय आरबीएसके 2.0 विशेष तपासणी अभियानाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जैस्वाल,जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी,जिल्हा आयपीएचएस अधिकारी डॉ.सुवर्णा उपाध्याय,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,आरबीएसके जिल्हा समन्वयक संजय बिसेन,अनिरुद्ध शर्मा,तालुका आरोग्य सहाय्यक आत्माराम वंजारी,प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदियाचे विविध शाखेचे प्राचार्य ओमेश्वर रहांगडाले,आशा राव,लीना कटकराव,विकास पटले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वात प्रथम माता धन्वंतरी व सरस्वती मातेचे पुजन मान्यवरांनी केले.
आरोग्य विभागाच्या आरबीएसके 2.0 विशेष तपासणी अभियानाअंतर्गत शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत होणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी यावेळी दिली.तपासणी अंती बालकांना आजार आढळल्यास त्यावर आरोग्य विभागामार्फत मोफत तपासणी,उपचार आणि गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन वानखेडे यांनी यावेळी दिली.कार्यक्रम अंती प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदिया येथील मुले व मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी शालेय शिक्षक यांनी शाळेत मोलाची कामगिरी केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अमरीश मोहबे तर सुत्रसंचालन संजय बिसेन व आभार प्रदर्शन योगेश पटले यांनी केले.यावेळी आरोग्य विभागातील आरोग्य विभाग,के.टी.एस.शासकीय सामान्य रुग्णालय,आरबीएसके पथकाचे वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स व कर्मचारी तसेच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल गोंदियाचे विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.