तालुकास्तरीय पशु संवर्धन प्रदर्शनीत इंजि.तरल कटरेचा सत्कार

0
509

गोरेगाव,दि.०४ः तालुक्यातील साेनी येथे आयोजित तालुकास्तरीय पशु संवर्धन प्रदर्शनीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प.बांधकाम व अर्थ सभापती डॉ.लक्ष्मण भगत,जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापूरे,माजी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले,गोरेगाव पंचायत समिती सभापती चित्रलेखा चौधरी,उपसभापती रामेश्वर महारवाड़े,पं.स.सदस्य किशोर पारधी,संचालक बाजार समिती शशिबाई फुंडे उपस्थित होते.या तालुकास्तरीय प्रदर्शनीत दवडीपार निवासी इंजि.तरल साहेबलाल कटरे यांनी आधुनिक युगात पशुपालनाकरीता सायलेज तयार करण्याच्या पध्दतीचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवले.तरल कटरे यांच्या या प्रयोगाबद्दल  पशु संवर्धन  विभागाच्यावतीने गौरव कऱण्यात आला.