गोंदिया, दि.6 : गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरु असून धान पिकासाठी, चिखलनी व वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची मागणी असते. कृषि केंद्र धारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे तथापी जिल्ह्यातील कृषि केंद्र संचालक ऑफलाईन पध्दतीने अनुदानित खताची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा कृषि केंद्रामध्ये मोहीम राबवून कृषि केंद्राची तपासणी केली असता अनुदानित खताची ऑफलाईन पध्दतीने विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, भाव साठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसताना निविष्ठा विक्री करणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे, बिलावर बॅच नंबर व उत्पादनाची तारीख न लिहिणे अशा कारणासाठी रासायनिक खताचे परवाने सडक अर्जुनी तालुक्यातील मनिष कृषि केंद्र डव्वा, रामटेके कृषि केंद्र घाटबोरी, श्री कृषि केंद्र चिखली. गोंदिया तालुक्यातील बर्डे कृषि केंद्र गर्रा, येडे कृषि केंद्र गर्रा, हरिणखेडे कृषि केंद्र रावणवाडी, आर्वी कृषि केंद्र गोंदिया, आर.एस.ॲग्रो एजन्सी एकोडी, चिखलोंडे कृषि केंद्र नागरा, कमल कृषि केंद्र खमारी, राधा कृषि केंद्र बिरसोला, जयदुर्गा कृषि केंद्र रतनारा, जयकिसान कृषि केंद्र बनाथर. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वक्रतुंड कृषि केंद्र अर्जुनी मोरगाव, शिवशक्ती कृषि केंद्र अर्जुनी मोरगाव. आमगाव तालुक्यातील अंजली कृषि केंद्र सुपलीपार, चाहत कृषि केंद्र कवडी, उपराडे कृषि केंद्र आमगाव, पटले कृषि केंद्र मोहगाव. देवरी तालुक्यातील तुरकर कृषि केंद्र सावली या 20 कृषि केंद्राचे परवाने एक महिन्याकरीता निलंबित करण्यात आले. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जयस्वाल कृषि केंद्र नवेगावबांध. सालेकसा तालुक्यातील श्री कृषि केंद्र सलंगटोला. आमगाव तालुक्यातील शेंडे कृषि केंद्र भोसा, एकांश कृषि केंद्र आमगाव, निर्मल कृषि केंद्र किडंगीपार, कोरे कृषि केंद्र आमगाव, अग्रवाल कृषि केंद्र अंजोरा. तिरोडा तालुक्यातील गुरुकृपा कृषि केंद्र तिरोडा, श्री साई कृषि केंद्र चुरडी. देवरी तालुक्यातील हिरवा सोना फारमर प्रोड्युसर कंपनी चिचगड या 10 कृषि केंद्राचे परवाने पंधरा दिवसांकरीता निलंबित करण्यात आले व भूमीपुत्र कृषि केंद्र बनगाव ता.आमगाव या कृषि केंद्राचा किटकनाशक परवाना एक महिन्याकरीता निलंबित करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील 30 खताचे व 1 किटकनाशकाचे असे एकूण 31 कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
कृषि सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकींग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषि निविष्ठा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावी, त्यावरील नमूद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, किटकनाशक कायदा 1968, किटकनाशक नियम 1971 नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.