नागरिकांचे जीवनमान सुलभ करणे, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार करून रोजगार निर्मिती करण्यावर भर अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण २०२५ अनुसार आगामी पाच वर्षात लाखो रोजगारांचे सृजन होईल. सोबतच राज्यातील प्रमुख रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून यामुळे दळणवळण जलदगतीने होईल. शेतीसाठी “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीचे आधुनिकीकरण सरकार करणार आहे. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प ज्यांमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण होण्यास गती मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, राज्यातील महापुरुषांची स्मारके देखील पूर्ण करण्यात येणार असून महाराष्ट्राला गतिमान करणारा हा अर्थसंकल्प आहे.
– राजकुमार बडोले, माजी मंत्री, आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा