सर्वसामान्य जनतेला समर्पित अर्थसंकल्प : आमदार विनोद अग्रवाल 

0
64

आवास योजनेत ५० हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारतर्फे अतिरिक्त देण्यात येणार आहे यामुळे घरांचा दर्जा आणखी वाढेल. सौर ऊर्जेने घरातले विजबिल शून्यावर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असेल सोबतच विक्रमी सोलर कृषी पंप बसविण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरूच राहणार असून अनेक लोककल्याणकारी योजना जशाच्या तश्या शासनाने सुरू ठेवल्या आहेत. आगामी पाच वर्षात लाखो रोजगार महाराष्ट्रात निर्माण होतील. उमेद मॉलमुळे महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. नदीजोड, जलयुक्त शिवार मुळे पाण्याची पातळी वाढेल. शेतकरी बांधवाना बियाणे, खते उपलब्ध करून देणे आणि शेतमाल वाहतूक सोपी व्हावी या करिता पाणंद रस्ते मजबूत करण्यात येणार आहेत. शहराचे सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देण्याचा निर्णय देखील स्वागताहार्य आहे एकूणच हा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याला शिखरावर घेऊन जाईल. दिव्यांगांसाठी जिल्हा निधी मधे १ टक्का निधी राखीव ठेवून सर्वसामान्य जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे.