दिशाहीन बजेट-माजी जिल्हा परीषद सदस्य गंगाधर परशुरामकर

0
92

आज राज्याचे उप मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांना राज्याचा बजेट सादर केला. या बजेट मध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांचे हिताचे कोणतेही निर्णय जाहीर न केल्याने हा बजेट दिशाहिन आहे, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीत सर्वच पार्टी आपले जाहिर नामे प्रसिद्ध करून मतदारांना आपणं सत्तेत आलो तर काय करणार यांचे आश्वासन देतात. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्ज माफी हे आश्वासन होते. पण आजचे बजेट मध्ये याचे प्रतिबिंब उमटले नाही. एवढेच नाही तर शेतकरी बांधवांनी उत्पादन केलेल्या भावाचे बाबतीत ही उल्लेख होता. त्याचा साधा साधा विचारही केला नाही. दररोज डिझेल खत कीटकनाशके मजुरी यांचे दर वाढत शेती परवडणारी राहिलेली नाही. तरी शेतीसाठी हे केलें ते ते केले हे सांगण्यापलीकडे काहीही राहिले नाही. निवडणुकी पुर्वी मास्टर लोकांनी वाढीव टप्पा मिळावा म्हणूण बरेच दिवस आंदोलन केले होते. शासन निर्णय निघाला पण बजेट मध्ये तरतूदच नाही. शिवभोजन थाळी याचाही उल्लेख नाही. असे अनेक विषय आहेत ज्यासाठी तरतूद नाही, म्हणून हे बजेट दिशाहीन आहे अशी टिका माजी जिल्हा परीषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे