गोंदिया,दि.१०ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळातील आपला पहिला अर्थसंकल्प मंगळवार ११ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत दुपारी १ वाजता सादर करणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे,समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे व कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे उपस्थित राहणार आहेत.अर्थ सभापती डाॅ.भगत यांच्या हाती मागील पदाधिकारी यांनी सत्ता सोपवतांना आधिच कामाचे नियोजन केल्याने खर्चाचा बोझवारा सोडून गेल्याने त्यांना तुटीचाच अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे.मात्र जिल्हा परिषदेचे उत्पादन वाढीकरीता अर्थ सभापती काय करतात याकडे लक्ष लागले आहे.