नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य – दानेश साखरे

0
37

नगर पंचायत अर्जुनी येथे बांधकाम विभागाची आढावा सभा संपन्न
अर्जुनी मोर.-नगरपंचायत क्षेत्रात रस्ते आहेत.परंतु बहुतेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.ठिकठिकाणी सांडपाणी साचत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून आत्ताच तापमान ३५ ते ४० अंशां पर्यंत वाढले आहे अशात नगरवासीयांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे.नगरपंचायत बांधकाम सभापती म्हणून संधी मिळाल्यामुळे या समस्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सोडवण्यास आपले प्राधान्य राहणार असे प्रतिपादन बांधकाम सभापती दानेश साखरे यांनी केले.
नगर पंचायत अर्जुनी येथे बांधकाम विभागाची आढावा सभा बांधकाम सभापती दानेश साखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. आढावा सभेमध्ये मुख्याधिकारी खांडेकर, नगरसेवक अतुल बनसोड,नगरसेवक सर्वेश भुतडा, नगरसेविका ममता भैय्या, नगरसेवक संजय पवार, प्रशासकीय अधिकारी स्वाती तायडे, अभियंता दीपक राऊत, लिपिक सुमित मेश्राम, शुभम आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
बांधकाम विभागांतर्गत आलेल्या तक्रारीच्या समस्या त्याविषयी चर्चा आणि तत्काळ कारवाई करावी. शहरातील आवश्यक नियोजन सुद्धा करण्यात आले. अनधिकृत इमारत बांधकाम केलेल्यावर दंडात्मक कारवाई करावी तर नवीन बांधकाम परवानगी करिता आलेल्या अर्जावर तातडीने ना–हरकत प्रमाणपत्र आदी नागरी समस्या सोडवण्यात प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी दिले.