अर्जुनी-मोर.-)भारताने सर्वच क्षेत्रात जगात आपली प्रतिमा उंचावली आहे. या प्रगतीमधे महिलांचा वाटा ही महत्वपुर्ण ठरत आहे.महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात केंद्र व राज्य सरकार यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.भारतीय कायदे अधिक मजबुत झाल्याने महिलांना आता मोठा दिलासा मिळाला असुन कुठल्याही क्षेत्रात काम करणे सोपे व निडरपणाचे झाले आहे त्यामुळे महिला आता प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याचे प्रतिपादन नवेगावबांध क्षेत्राच्या जि.प.सदस्य रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत नवेगावबांध, संविधान, सत्यम,जयहिंद, जिजाऊ,व तरंग ग्रामसंघाचे संयुक्त विद्यमाने नवेगावबांध येथे ग्रामसंघाचे वार्षिक सभा व जागतिक महीला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन रचनाताई गहाणे बोलत होत्या.उद्घाटन सरपंच हिराताई पंधरे यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणुन माजी उपसभापती होमराज पुस्तोळे, माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे,शारदा डोंगरवार,हिराबाई तरोणे,चेतना डोंगरवार,शालु गोंधळे,रेखा झोळे,रेखा काशिवार,ग्रामपंचायत अधिकारी इ.व्ही.रामटेके,उपसरपंच रमन डोंगरवार, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, माॅ.जिजाऊ व मातोश्री रमाबाई आंबेडकर, व थोर समाजसुधारकांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी उपस्थित ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या महिला पदाधिरी यांनी आपापल्या संघाच्या प्रगतीचा वार्षीक अहवाल वाचुन दाखविला.यावेळी विविध मान्यवर व महिला पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त करतांना उमेद च्या माध्यमातून व ग्रामसंघाचे माध्यामातुन महिला स्वावलंबी,उद्योगशील, व आत्मनिर्भर कशा बनल्या यावर विचार व्यक्त केले.या वेळी महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.