32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गोंदिया जि.प.चा २०२५-२६ चा १९ कोटी रुपयाच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प सादर

गोंदिया जि.प.चा २०२५-२६ चा १९ कोटी रुपयाच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प सादर

0
1050

blank

गोंदिया जिल्हा परिषदेचा 2024-25 चा ३४ कोटी खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प सादर

२०२५-२६ वर्षाचा संभाव्य खर्चाचा १८ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयाचा अर्थसंकल्प सादर

गोंदिया,दि.११ : जिल्हा परिषदेचा सन २०२४-२०२५ चा सुधारीत 34 कोटी 78 लाख 45 हजार रुपये व २०२५-२६ चा 19 कोटी 69 लाख 75 हजार रुपयांच्या संभाव्य खर्चाचा तर २०२५-२६ वर्षात संभाव्य १८ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपये उत्पन्न असलेला तुटीचा अर्थसंकल्प जि.प.अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत यांनी आज (दि.११) सभागृहात सादर केला.

त्यातच शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत अखर्चित निधी परत मागविल्यामुळे सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात गुंतवणूकीवरील व्याज कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तवित ती रक्कम ९ कोटी ७० लाख रुपयापर्यंत असण्याचा अंदाज असल्याने हा संंभाव्य अर्थसंकल्प काटकसरीचा ठरला आहे.त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद सदस्यांचा स्थानिक विकास निधीकरीता जे ८ लाख रुपये प्रमाणे सुधारित अंदाजपत्रकात ६ कोटी २७ लाख ठेवण्यात आले होते,ते मात्र संभाव्य अंदाजपत्रकात ६ लाख रुपये प्रमाणे ३ कोटी १८ लाखाची तरतूद करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या योजना अमंलबजावणीकरीता मात्र सुधारित अंदाजपत्रकापेक्षा २० लाख रुपयाची अधिक तरतूद संभाव्य अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.blank

विद्यार्थ्यांना ओळखपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,बौध्दिक स्पर्धा,शाळेकरीता पाण्याची व शौचालयाची व्यवस्था आणि स्वाधाय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याकरीता नवीन लेखाशिर्ष तयार करण्यात आले असून संभाव्य अंदाजपत्रकात शिक्षणाकरीता २.२० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरू सुरवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापूरे, महिला बालकल्याण सभापती सौ. पौर्णिमा ढेंंगे, समाजकल्याण सभापती सौ.रजनी कुंभरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरंगनथन,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुतीरकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेचे वर्षातील सुधारित उत्पन्न २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात 16 कोटी 03 लाख 77 हजार रुपयाचे मूळ अंदाजपत्रक होते.ते सुधारित करुन ३४ कोटी ७८ लाख ४५ हजार रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

विशेष म्हणजे घड्याळी तासिकेवरील शिक्षक नियुक्तीकरीता सुधारित अंदाजपत्रकात ८४ लाख रुपये तर 202५-2६च्या संभाव्य अर्थसंकल्पात ५० लाख रुपयाती तरतूद करण्यात आली आहे.अटल क्रिडा स्पर्धेकरीता सुधारीत अंदाजपत्रकात ४० लाख रुपये तर संभाव्य अंदाजपत्रकात २५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता दुकानगाळे बांधकामाकरीता 202५-2६ च्या संभाव्य अर्थसंकल्पात 30 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जि.प.सदस्यांच्या स्थानिक विकास निधीकरीता २०२५-2६ या वर्षाकरीता 3 कोटी 18 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक मालमत्तेच्या परिरक्षणाकरीता ६ कोटी ७६लाख २३ हजार,शिक्षणावर २ कोटी २० लाख २६ हजार, आरोग्य विभागाकरीता  ८६ लाख ७५ हजार रुपये,समाजकल्याण विभाग,मागासवर्गीयांच्या कल्याणसााठी योजनेकरीता ७० लाख ६० हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधी अंतर्गत १९ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.महिला बाल कल्याण विभागाकरीता १ कोटी ३२ लाख ५७ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाकरीता १ कोटी ४१ लाख ७१ हजार,पशुसंवर्धन विभागाकरीता ७३ लाख ६६ हजार, सामान्य प्रशासन विभागाकरीता २ कोटी ४७ लाख ३० हजार, वित्त विभागाकरीता ६० लाख ५१ हजार रुपये, पंचायत विभागाकरीता ७८ लाख ६२ हजार, लघु पाटबंधारे विभागाकरीता ९२ लाख ५४ हजार रुपयाचा निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती सभापती भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सभागृहाला दिली.

blank