अंतिम संस्कारासाठी गेलेल्या दोघांना जेसीबीने चिरडले, एक गंभीर जखमी

0
220

गोंदिया : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या व घराकडे परत येत असताना पाठी मागून वेगात येणाऱ्या जेसीबीने धडक दिल्याने एक गंभीर जखमी तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात दिनांक १० मार्च रोज सोमवारला सावरटोला पिंपळगाव मार्गावरील चापटी नाल्यावर दुपारी १२:३० ते १:०० वाजेच्या दरम्यान झाला.नसीब बलवत्तर म्हणून दोघांचाही जीव वाचला. गोविंदा मोडकू डोये वय ६५ वर्षे,योगेश चंद्रकुमार लाडे (४२वर्षे)राहणार सावरटोला असे जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सावरटोला येथील यमुना उरकुडा तरोणे या काल रात्री मरण पावल्या. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी पिंपळगाव मार्गावरील चापटी नाल्यावर गेले होते.दुपारी १२:३० ते १:०० वाजेच्या दरम्यान अंतिम संस्कार आटोपून घराकडे परत येण्यासाठी पुलावर मोटार सायकलवर बसत असतानाच, जेसीबीने मागेहून धडक दीली. सहा ते सात फूट फरफटत नेल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले.

गोविंदा डोये यांच्या छातीला जबर दुखापत झाली आहे. ड्रायव्हरची समोर लक्ष नव्हते मोटर सायकल जवळ जेसीबी येतात लोकांनी आरडाओरड केली परंतु त्याकडे चालकाचे लक्ष नव्हते व जेसीबीने मोटरसायकलला धडक दिली व दोघांनाही पुढे पाच ते सात फूट फरफटत नेल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले. अपघात होताच उपस्थितांनी ॲम्बुलन्सला पाचारण केले. प्रथम उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले होते.

गोविंदा डोये यांच्या छातीला दुखापत असल्यामुळे सदर रुग्णाला केटीएस जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याचे, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश नशीने यांनी सांगितले.

सदर जेसीबी बोरटोला येथील किशोर रामकृष्ण शिवणकर यांच्या मालकीची असल्याचे समजते.वाहक घटनास्थळ वरून फरार झाला आहे. तर योगेश चंद्रकुमार लाडे यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. गोविंदा डोये यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे.तसेच हाता-पायालालाही दुखापत झाली आहे. तेही खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्या पुलावर गर्दी असतानाही सदर ड्रायव्हरने हलगर्जीपणा केला. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्याया दोघांना धडक दिली असे प्रत्येकदर्शीने सांगितले.

ब्रेक फेल झाल्याची बतावणी सदर वाहन चालक व मालक करीत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. परंतु अपघात हा वाहन चालकाच्या हलगर्जीपणाने झाला असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. आता पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.