महिलांनी समाज हित साधून कार्य करावे : खा.भारती पारधी

0
31

पोवार बोर्डिंग येथे महिला मेळावा थाटात
गोंदिया,दि.१२ : राष्ट्राच्या प्रगतीत आता महिलांचेही योगदान मिळत आहे. मात्र सामाजिकदृष्ट्या काही ठिकाणी महिलांना कमी पडावे लागते. ही बाब हेरून महिलांनी संघटीत व्हावे, तसेच समाज हित साधून कार्य करावे, असे आवाहन बालाघाटच्या खासदार सौ.भारती पारधी यांनी व्यक्त केले.
त्या स्थानिक पोवार बोर्डिंग येथे ९ मार्च रोजी आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पवार प्रगतीशील मंच व महिला समितीच्या वतीने ९ मार्च रोजी स्थानिक पवार सांस्कृितक भवन कन्हारटोली येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बालाघाटचे खासदार सौ. भारती पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य विमल कटरे होत्या. अतिथी म्हणून जि.प.सदस्य अश्विनी पटले, पं.स.सभापती योगिताबाई फुंडे, पं.स.सभापती चित्रलेखाबाई चौधरी, पं.स.उपसभापती सुनंदाबाई पटले, पं.स.सदस्य वंदना पटले, विद्याकला पटले उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून तिरोडाचे आगार व्यवस्थापक संजना पटले, बालविकास प्रकल्प अधिकारी शितल कटरे, पो.हवा.प्रिया शंरणागत, डॉ.प्रिती देशमुख, सौ.रश्मी रहांगडालआदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान अतिथी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथीनी मार्गदर्शन केले. तर पुढे बोलताना खा.पारधी यांनी महिलांना सुरक्षा व विकासात्मक दृष्टीकोनातून उपाययोजनेसाठी आपण लोकसभेत पाठपुरावा करणार, असे आश्वासन दिले. आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला समितीच्या अध्यक्ष आरती कटरे यांनी केले. तर संचालन स्वाती बिसेन व आभार भुमिका येडे यांनी मानले.
कार्यक्रमाला दुर्गा ठाकरे, रंजू रहांगडाले, शैफाली बिसेन, दीप्ति पटले, आरती चौधरी, कोषाध्यक्ष अ‍ॅड. राजकुमारी कटरे, मोहिनी बोपचे, शिल्पा पटले, सुनिता कटरे, इंद्रायनी रहांगडाले, पुजा टेंभरे, लक्ष्मी ठाकुर, कुंतन पटले, कविता चौधरी, ममता येडे, शोभिका बिसेन, सिमा हिरणखेडे, जानकी पारधी, शितल पटले, प्रिती बघेले, प्रतिभा रहांगडाले, रेखा बिसेन, त्रिवेणी बघेले, अश्विनी कटरे, राधा चौधरी, मिना टेंभरे, सुनिता ठाकुर, कंचन हरिणखेडे यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.