गोरेगाव,दि.१५ः तालुक्यातील निंंबा ग्रामपंचायत कार्यालयात 12 मार्च बुधवारला ग्राम पंचायत कार्यालय महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण सभापती रजनीताई कुंभरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत हे होते.
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपाताई चंद्रिकापुरे,पंचायत समिती सभापती चित्रकलाताई चौधरी,पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे,गोंदिया पंचायत समिती सदस्य शैलजाताई सोनवणे,सोनालीताई साखरे सरपंच कालीमाती, वैशालीताई कुसराम सरपंच पिपरटोला ,सावरकर मॅडम सुपरवायझर मुंडीपार बीट, आरोग्य सेविका प्रमिला पटले ,माजी सरपंच उर्मिलाबाई पंधरे ,रेखाताई शिवणकर ,कु. एल आर कुंभरे वनरक्षक निंबा, ग्राम पंचायत सदस्य मालताताई भगत पुष्पाताई पटले , संगीता कुजाम ,पुष्पाताई भंडारकर ,विमलाताई परसगाये ,नंदलाल उईके, महेश भगत ,संजय शहारे ,ग्रामपंचायत कर्मचारी देवराज गावड छगनलाल कुमडे, हेमराज कोसरे , अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण, सुनीता लेदे ,छाया साखरे ,राखी पारधी , शिरवंता परसगाये, लता पुसाम,तसेच ग्रामपंचायत निंबांतर्गत सर्व अंगणवाडी मदतनीस, व सर्व उमेद बचत गट, महिला बचत गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महिला उमेद बचत गटाचे सीआरपी, आशाताई आणि समस्त निंबा ग्रामपंचायत महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला मेळाव्याचे प्रस्तावना करताना सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी महिला मेळावा आपण का करतो , व मेळावा करण्याची गरज आज काय, याबाबत सविस्तर सांगून ग्रामपंचायत बद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी ग्राम पंचायत निंबा मार्फत नवनिर्वाचित सभापती जिल्हा परिषद गोंदिया तसेच सन्माननीय सरपंच व गावातील महिला यांचे महिला मेळाव्याचे अवचित्य साधून शाल श्रीफळ , मुव्हमेंटो सन्मान चिन्ह ,व एक वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला .तसेच गावातील महिला मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व महिलांना झाड लावण्यासाठी कुंडी वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच पुरुषोत्तम कटरे यांनी केले ,तर आभार ग्रामविकास अधिकारी विलास सूर्यवंशी यांनी मांनले.