टीबी हॉस्पिटल ग्राउंडवर १५ कोटींच्या निधीतून ५० बेडचे आयुष हॉस्पिटल उभारले जाणार

0
159

गोंदिया,दि.१६-कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतींची गरज प्रकर्षाने जाणवली. मात्र, KTS आणि BGW रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी पुरेशी जागा नव्हती. या आव्हानाला पाहता, आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक बैठका घेतल्यानंतर टीबी टोली परिसरातील टीबी हॉस्पिटल ग्राउंडवरील जागा या प्रकल्पासाठी आरक्षित करून घेतली.

*१५ कोटींची मंजुरी, गोंदियाला मिळणार ५० बेडचे आयुष हॉस्पिटल*

जमीन उपलब्ध झाल्यानंतर विधायक विनोद अग्रवाल यांनी आणखी एक मोठे यश मिळवले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शासनाने १५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या ५० बेडच्या आयुष रुग्णालयाला मंजुरी दिली. या रुग्णालयाच्या उभारणीमुळे गोंदिया जिल्ह्यात आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडेल आणि नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुष पद्धतीचे उपचारही सहज उपलब्ध होतील.

*या नवीन आयुष रुग्णालयात सुविधा*

आयुष उपचार पद्धती – आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि योग उपचार

होमिओपॅथी – नैसर्गिक पद्धतीने आजारांवर उपचार

पंचकर्म चिकित्सा – शरीराला रोगमुक्त करण्यासाठी विशेष उपचार

त्वचा विकार उपचार – त्वचारोगांवर आयुष पद्धतीद्वारे उपचार

कान, नाक आणि घसा विकार उपचार

योग आणि ध्यान केंद्र – शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी

प्रजनन व शिशु आरोग्य विभाग – माता व बाल आरोग्यसाठी विशेष सेवा

बाह्य व आंतररुग्ण विभाग – सर्वसमावेशक आयुष उपचारांसाठी

आमदार विनोद अग्रवाल यांनी या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करून जिल्ह्याच्या जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. हे रुग्णालय केवळ गोंदियाच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर आसपासच्या भागांतील रुग्णांसाठीही अत्यंत लाभदायक ठरेल.आगामी काळात हे रुग्णालय आरोग्य सेवेत नवे आयाम निर्माण करेल.