शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड असावी:- आमदार राजकुमार बडोले

0
16

सडक अर्जुनी,दि.२४ः केंद्र व राज्यशासनानी शेतक-यांचे आर्थीक स्तर उंचावण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. नुकत्याच सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरात आणण्यासाठी 500 कोटीची तरतूद केली आहे. यामुळे शेतकरी अत्याधुनिक होईल, सोबतच 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे.त्यामुळे शेतकरी समृध्द होईल. शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसायांकडे वळुन धवल क्रांतीकडे वळावे व आपली प्रगती साधावी असे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने वडेगाव सडक येथे आयोजित तारीख 23 तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन मिळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पशु व कृषी सभापती दीपाताई चंद्रिकापुरे, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, पंचायत समिती उपसभापती निशाताई काशीवार, माजी सभापती शैलजाताई सोनवाणे, माजी जि. प. सभापती अशोक लंजे, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य संगीताताई खोब्रागडे, माजी उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, डॉ. रुकीराम वाढई, सरपंच रीनाताई तरोणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. पी. पटले, उपसरपंच दिनेश मुनेश्वर, मार्कंड मेंढे, कठानेजी, संदीप डोये, चरणदास शहारे, प्रल्हाद कोरे, छगन फुंडे ,गटविकास अधिकारी रविकांत सानप, केदारनाथ गौतम, डॉ. श्रीकांत वाघाये, डॉ. संजीवनी वाघमारे अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनीही मेळाव्याला मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद गोंदिया सदैव शेतक-यांचे पाठीसी आहे.शेतकरी समृध्द तर देश समृध्द या धर्तीवरच विद्यमान सरकारचे कामकाज सुरु आहे.जि.प. च्या शेतीविषयक विवीध योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहचतील या दिशेनेच आपले प्रयत्न सुरु आहेत.असे सांगुन गोंदिया जि.प.च्या विवीध योजनांची माहीती दिली.यावेळी उपस्थीत मान्यवरांनी विविध स्टाल व कृषीविषयक प्रदर्शनीला भेट दिली.