•महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती
गोदिया , दि.२४ : गोंदिया जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयासाठी पाच एकर जागेचा प्रस्ताव आहे. त्याठिकाणी दहा एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. अशी जागा शहरालगत उपलब्ध नाही. मात्र, दोन पर्यायी जागांसाठी प्रयत्न सुरू असून जागेचा प्रश्न मार्गी लावू अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली. विशेष म्हणजे बेरार टाईम्स ने सदर मुद्दा सातत्याने उचलला आहे.
विधान परिषदेत गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाबाबत आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले, की गोंदिया शहरालगत पाच एकर जागा उपलब्ध नसली तरी दोन पर्यायी जागा विचाराधीन आहेत. यामध्ये मोजा फुलचूर येथे ४.१५ हेक्टर आणि १.४१ हेक्टर इतक्या दोन मोठ्या जागा उपलब्ध असून, झुडपी जंगल क्षेत्र असलेल्या या जागा शासनाच्या परवानगीने वापरण्याचा पर्याय तपासला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात जागेचा शोध घेतला असता, महसूल विभागाच्या तपासणीत शहरालगत आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, झुडपी जंगल क्षेत्रातून जागा मिळू शकते का, यावर सध्या सरकार विचार करत आहे. सुप्रीम कोर्टात झुडपी जंगल क्षेत्राच्या वापराबाबत राज्य सरकारने अंतिम सबमिशन केले आहे आणि त्यावर तातडीने परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जर ही परवानगी मिळाली, तर गोंदिया शहरालगतच असलेल्या दोन मोठ्या भूखंडांमधून एक जागा केंद्रीय विद्यालयासाठी निश्चित करता येईल.
…………………………………………