गोंदिया,दि. २४ मार्च : शिक्षण विभागातील लेखाधिकारीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लेखाधिकारी संजय रामभाऊ बोकडे (वय ४९) यांना ₹२५०० लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपी बोकडे हे लेखा परीक्षण पथक शिक्षण विभाग, गोंदिया येथे लेखाधिकारी (वर्ग २) पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार हे लोकसेवा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोसमतोंडी (ता. सडक अर्जुनी) येथे मुख्याध्यापक आहेत. त्यांचे कर्मचारी भीमराव रंगारी यांचे डिसेंबर २०२४ मध्ये निधन झाले. त्यांच्या आश्वासित प्रगती योजनेच्या दुसऱ्या वेतन निश्चितीच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे लेखाधिकारी बोकडे यांना देण्यात आली होती.
सदर वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी बोकडे यांनी सुरुवातीला ₹३००० लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ₹२५०० ठरली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे केली.
*आदरणीय महोदय*
*”यशस्वी सापळा कारवाई अहवाल “*
*घटक :- गोंदिया*
१) *तक्रारदार* :-
पुरुष वय ५७ वर्ष,
२) *आरोपी लोकसेवक* :-
श्री संजय रामभाऊ बोकडे वय ४९ वर्ष, धंदा नोकरी, पद- लेखाधिकारी (वर्ग २) लेखा परीक्षण पथक शिक्षण विभाग गोंदिया.
रा. प्रदीप सिंग वर्मा यांच्या घरी किरायाने, १८ पवनसुत नगर,रमणा मारुती बस थांब्याजवळ, नागपूर
३) *तक्रार प्राप्त*
दि. २४/०३/२०२५
४) *पडताळणी*
व
*सापळा कार्यवाही*
दि. २४/०३/२०२५
*लाच मागणी* रु.३०००/-
तडजोडी अंति लाच मागणी रू २५००/-
*घटनास्थळ*- लेखाधिकारी कार्यालय, लेखा परीक्षण पथक, शिक्षण विभाग गोंदिया, मनोहर नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया .
*तक्रारीचे स्वरूप* – यातील तक्रारदार हे लोकसेवा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी ता. सडक अर्जुनी येथे मुख्याध्यापक असून त्यांच्या विद्यालयात परिचर म्हणून नोकरी करणारे भिमराव रंगारी हे डिसेंबर २०२४ मध्ये मरण पावले आहेत. त्यांच्या सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसऱ्या लाभाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे आलोसे यांना दिली होती. सदर वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी आलोसे हे ३०००/- रू लाच मागणी करीत असल्याबाबत
तक्रारदार यांनी ला.प्र.वि.कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली .
▶️ *पडताळणी*
लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीअंती आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष २५००/-रुपये लाच रकमेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची
तयार दर्शवीली.
▶️सापळा कारवाई दरम्यान आलोसे ने पंचासमक्ष २५००/- रू. लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन गोंदिया शहर जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरुआहे .
▶️ आरोपीच्या अंग झडती मध्ये मिळुन आलेल्या वस्तू- रोख रूपये ३५५००/-
सॅमसंग कंपनी चा मोबाईल फोन.
सदर फोनचे परीक्षण करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
▶️ आरोपी ची घर झडती घेणे सुरू आहे.
▶️ *मार्गदर्शन* :
*डॉ.श्री दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.* *नागपूर परिक्षेत्र, नागपूर,*
**श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.*
*श्री संजय पुरंदरे*,
*अपर पोलीस अधीक्षक*
*ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र*
▶️ *पर्यवेक्षक अधिकारी* *श्री विलास काळे*
*पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.गोंदिया*
▶️ *सापळा -अधिकारी*
*राजीव कर्मलवार*
*पोलीस निरीक्षक*
*▶️*सापळा कार्यवाही पथक*
*विलास काळे*
*पोलीस उप अधिक्षक*
*राजीव कर्मलवार*
*पोलीस निरीक्षक*
*श्री उमाकांत उगले*
*पोलीस निरीक्षक* स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे, म.ना.पो.शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दीपक बाटबर्व यांनी ही कारवाई केली.